Advertisement
नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून नागपूर महानगरपालिका (NMC) आणि सीताबर्डी फेरीवाले यांच्यावर वाद पेटला आहे.या वादावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.
याविरोधात बुधवारी सीताबर्डीतील फेरीवाल्यांनी आपली दुकाने थाटण्याऐवजी गजबजलेल्या रस्त्यावर मूक आंदोलन केले. महापालिकेचा अतिक्रमण विरोधी विभाग अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्यास सज्ज झाले आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जनसुनावणी कार्यक्रमात टीका केल्यानंतर सीताबर्डी मार्केटमधील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिकेने मोहीम सुरू केली. महापालिकेच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी फेरीवाले मैदानात उतरले.
टाऊन व्हेंडिंग कमिटीच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची मागणी करणारे आणि त्यांच्या प्रश्नांकडे राजकारण्यांचे दुर्लक्ष केल्याच्या विरोधात फलक हातात घेत मूक आंदोलन केले आहे.