Advertisement
नागपूर:नागपूर पोलिसांनी ड्रग्स फ्री सिटीसाठी पुढाकार घेत जप्त केलेला तब्बल 733.78 कि.ग्रॅम गांजा नष्ट केला. आज, 14 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता बुटीबोरी एमआयडीसी एरिया, मांडवा व्हिलेज, नागपूर येथे असलेल्या महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड येथे हे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. योग्य देखरेखीसाठी अंमली पदार्थ समितीच्या उपस्थितीत या गांजाची विल्हेवाट लावण्यात आली. पोलीस आयुक्तालया अंतर्गत विविध पोलीस ठाणे येथे एन. डी. पी. एस. कायद्यांतर्गत दाखल एकूण 110 गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेले बेकायदेशीर अमली पदार्थ नष्ट करण्याची कायदेशीर बाबांची पूर्तता करून महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळच्यायला परवानगीने हा निर्णय घेण्यात आला.