Advertisement
नागपूर: शहरात सकाळी पाडलेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरकरांना उखाड्यापासून मोठा दीलासा मिळालेला आहे.सात वाजता सुरू झालेला पाऊस आठ वाजेपर्यंत सुरूच होता. शहरात एका तासात दोन मिमी पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यात जुलै महिन्यात आणि ऑगस्टच्या सुरुवातीच्या आठवड्यात अतिवृष्टीची नोंद झाली. मात्र, दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा वेग कमी झाला. गेल्या काही दिवसांपासून शहरात पाऊस नाही.
त्यामुळे हवामानातील आर्द्रता आणि उष्णता वाढली होती. त्यामुळे नागरिकांचे हाल होत होते. पावसाअभावी आणि वाढती आर्द्रता यामुळे शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत होती.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी शहराचे किमान तापमान 23.5 इतके नोंदवले गेले. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस नोंदले गेले.