नागपूर : धंतोली पोलीस ठाण्यातील पीएसआय दीपक चौरपगार यांचा गुरुवारी रात्री उशिरा मानकापूर उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक पोलिस स्टेशनमधील ड्युटी संपवून घरी जात होते. रात्री 11.30 वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिल्याने दीपकचा दुचाकीवरील ताबा सुटून जोरात रस्त्यावरच पडले.
या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींनी नोंदवले की दीपक रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडून होते.मात्र त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी कोणतेही वाहन थांबले नाही.परिणामी त्यांना जीव गमावला लागला.
अखेर खूप वेळेच्यानंतर स्थानिकांनी त्याला मॅक्स हेल्थ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.