मुंबई: बदलापूर घटनेच्या विरोधात विरोधकांच्या महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार नसून जे लोक बंद पुकारतील त्यांच्याविरोधात कारवाई करा, असे आदेश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत.
शहरातील एका शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
मात्र या बंदविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी मुंबई हायकोर्टाने सदर बंद बेकायदेशीर असल्याचे म्हटले. न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा दिलास मिळाला आहे.
दरम्यान न्यायालयाच्या टिपण्णीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.