Advertisement
नागपूर : शहरातील बजाज नगर येथील हॉटेल NH-1 मध्ये बेकायदेशीर दारू विक्रीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाने ५ जुलै २०२४ रोजी केली होती. मात्र त्यानंतरही हॉटेलमध्ये असाच प्रकार सुरु होता. विभागाकडून पुन्हा २७ जुलै रोजी छापा टाकला आणि गुन्हा क्रमांक 74/2024 कलम 68 ची नोंद केली.
कोणत्याही FL-3 परवान्याशिवाय मद्यविक्री करताना आढळलेल्या या जागेवर बॉम्बे लिकर ॲक्ट, 84 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक शैलेश अजमिरे यांनी याबाबत एक परिपत्रकही जाहीर केले.