Advertisement
नागपूर: जैन धर्मातील श्वेतांबर आणि दिगंबरा समाजातील लोक भाद्रपद महिन्यात पर्युषण सण साजरा करतात. पर्युषण पर्व निमित्त शुक्रवार दिनांक ३० ऑगस्ट (श्रवण कृ. १२) रोजी व शनिवार 7 सप्टेंबर (भाद्रपद शु. ४) रोजी नागपुर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहे.
या संदर्भातील आदेश मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी निर्गमीत केले आहे. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर मनपाच्या भरारी पथकाद्वारे कार्यवाही करण्यात येईल.
दरम्यान जैन धर्मातील सर्व सणांमध्ये पर्युषण सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यामध्ये जैन धर्मीय लोक 10 दिवस उपवास, व्रत आणि तपश्चर्या करतात. यासोबतच ते आराध्य दैवत महावीर स्वामींची पूजा करतात.