Advertisement
नागपूर : शहरातील मध्यवर्ती बसस्थानक म्हणून मोरभवन बसस्थानक ओळखले जाते. या बसस्थानकावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात.
पावसामुळे मोरभवन बसस्थानक स्थानकात चिखल व पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वीच नागपूर टुडेच्या टीमने याकडे लक्ष वेधले होते.
यांनतर नागरिकांना होणारा त्रास पाहता महापालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. वरील सूचनांनुसार सार्वजनिक बांधकाम विभाग व हॉटमिक्स प्लांट विभागाने माती व गाळ टाकून खड्डे बुजवून सपाटीकरणाचे काम सुरू केले आहे.
काही दिवसांपूर्वी संततधार पावसामुळे मोर भवन (विस्तारित) बस डेपोमध्ये पाणी साचल्याने चिखल झाला होता.त्यामुळे बस चालविणे आणि आगारातून प्रवाशांना प्रवास करणे कठीण झाले होते.