नागपूर : राज्याचे आराध्य दैवत असेलेल्या लाडक्या बाप्पाच्या आगमन येत्या 7 सप्टेंबरला होणार आहे. नागपुरात, विशेषत: ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या चितार ओळी बाजारपेठ गणपती बाप्पाच्या मूर्तींनी झगमगले आहे. . आकार घेतलेल्या गणरायाच्या मूर्तीवर कारागीर अखेरचा हात फिरवताना दिसून येत आहेत. यात मूर्तीचे डोळे, दागिने आदी रंगरंगोटीची कामे सध्या वेगात सुरू असून रंगकाम करणाऱ्या कामगारांनाअतिरित्त मेहनत करावी लागत आहे.
या गजबजलेल्या बाजारपेठेत अगदी लहान, आकर्षक डिझाइन केलेल्या मूर्तींपासून ते भव्य हिल टॉप बाप्पाच्या मूर्तींपर्यंत, सर्व अपवादात्मक कौशल्याने आणि भक्तीने तयार केलेले आहेत. भक्त त्यांच्या घरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणपतीच्या स्वागतासाठी तयारी करत असताना, चितार ओली या तयारीच्या केंद्रस्थानी आहे.
विघ्नहर्त्या गणेशाचा उत्सव अवघा एक आठवड्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारपेठा सजल्या असून बाजारात तयार मूर्तीचे अनेक कला केंद्र सुरू करण्यात आले आहेत. बाजारात तयार मूर्ती जर उपलब्ध असल्या तरी येथील पारंपारिक आणि स्थानिक गणेशभक्त आजही आपल्या जुन्याच मूर्तिकाराच्या हाताने मूर्ती घडवण्यावर भर देत आहेत. त्यामुळे आज जरी नागपुरात हाताच्या बोटावर मोजण्या इतके गणपती कारखाने शिल्लक असले तरी आपल्या चितार ओळी ग्राहकांसाठी मूर्तीकारांनी आपली कला जिवंत ठेवत कारखाने चालवत आहेत.
चितार ओळीचा साडे तीनशे वर्षांचा इतिहास-
चितार ओळी… मध्य भारतातील सगळ्यात मोठी मूर्तीकारांची बाजारपेठ. नागपुरात राहणाऱ्या व्यक्तीला या बाजारापेठेविषयी विशेष सौख्य आहे.
मध्य नागपूरची चितार ओळ बाजारपेठ तब्बल साडे तीनशे वर्षे जुनी आहे. राजे रघुजी राजे भोसले यांनी मातीच्या मूर्ती घडविणाऱ्या कलाकारांना मध्य भारतातील विविध ठिकाणांहून बोलावून मुद्दाम इथे वसवण्यात आले होते आणि तेव्हापासून इथे पिढ्या न पिढ्या मातीच्या रेखीव, सुबक मूर्ती घडविल्या जातात.