नागपूर : डेंग्यू,चिकनगुनियासह खड्डे घेऊन जा ऽऽ गे मारबत…अशी साद देत मंगळवारी नागपुरात धुमधडाक्यात मारबत उत्सव पार पडला.शहारात काढण्यात येणाऱ्या या मारबत उत्सवात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्ध आहे. आज पहाटे सकाळपासून काळी आणि पिवळी मारबतची मिरवणूक काढण्यात आली.डीजेच्या तालावर नाचत तरुणाईंनी हा उत्सव साजरा केला. मारबत मिरवणूक नेहरू चौकात पोहोचल्यानंतर पिवळी-काळी मारबतची गळाभेट झाली.
नागपूरच्या जगनाथ बुधवारी भागात राहणाऱ्या तेली समाज बांधवांनी पिवळी मारबत उत्सव 1885 साली साजरा करण्यास सुरुवात केली. आज काळी मारबत या परंपरेला 144 वर्ष पूर्ण झाले आहेत. तर पिवळ्या मारबतीला 140 वर्षे पूर्ण झाली आहेत.
नागपुरात धुमधडाक्यात रंगला मारबत उत्सव; पिवळी-काळी मारबतची झाली गळाभेट! #nagpur #nagpurnews #pilimarbat pic.twitter.com/BJlmgxCglj
— Nagpur Today (@nagpurtoday1) September 3, 2024
मारबत म्हणजे वाईट रुढी- परंपरा,अंधश्रद्धेच दहन-
इंग्रजांची राजवट देशात असताना नागरिकांना एकत्र करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीने पुण्यात गणेशोत्सव सुरू केला होता, त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात देखील मारबत उत्सव सुरू करण्यात आला. प्राचीन काळात अनेक रूढी परंपरा होत्या, त्या मानव जातीसाठी घातक ठरत होत्या. समाजातील अनिष्ट प्रथांचं उच्चाटन करण्याच्या हेतूने मारबत म्हणजे वाईट रुढी- परंपरा,अंधश्रद्धेच दहन करणे आणि चांगल्या परंपरा,विचारांचे स्वागत करणे या मागचा एक उद्देश आहे. मारबत उत्सवाला महाभारताच्या काळात संदर्भ देखील दिला जातो.
मारबत उत्सवाचा उद्देश-
उत्सवातील मारबत आणि बडग्या हे वाईट शक्तींचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे या वाईट शक्तींची वाजत-गाजत धिंड काढून त्यांना शहराबाहेर दहन करण्याची आणि शहर स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि समस्याविरहित ठेवण्याचा उद्देश या उत्सवामागे आहे.