Advertisement
बुलडाणा : जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट, पाडळी, मढ येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे.
येळगाव धरण अगोदरच ९० टक्के भरले असून पुरामुळे धरणाच्या मागून येणाऱ्या पाण्यामुळे धरणाचे स्वयंचलित गोडबोले गेट उघडल्याने पाणी ओसंडून वाहत आहे.
दरम्यान, बुलढाणा ते चिखली महामार्गावरील येळगाव टोलनाक्याजवळील पैनगंगा नदीच्या पुलाजवळ पुराचे पाणी वाहत असल्याने नागपूर पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. त्याचबरोबर अनेकांच्या शेतात पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.