Published On : Wed, Sep 4th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या संविधान चौकात आदिवासी गोवारी गोंड समाजाचे आंदोलन; सरकारला दिला उपोषणाचा इशारा

Advertisement

नागपूर : आदिवासी गोंड-गोवारी समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आज बुधवारी संविधान चौकात एकदिवसीय आंदोलन केले. 6 सप्टेंबरपर्यंत सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास 7 सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असे आंदोलकांनी सांगितले.

आदिवासी गोंड-गोवारी समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. गोंड-गोवारी समाजाला आदिवासी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळावे व इतर मागण्यांसाठी नागपुरात अनेक छोटी-मोठी आंदोलने झाली आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नागपुरात समाजाने चक्का जाम आंदोलन केले होते.

Gold Rate
Friday 17 Jan. 2025
Gold 24 KT 79,500 /-
Gold 22 KT 73,900 /-
Silver / Kg 91,400 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान आदिवासी गोंड-गोवारी समाजाच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे. याअंतर्गत पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आपल्या समर्थकांसह संविधान चौकात पोहोचले आणि त्यांनी संपावर बसलेल्या आंदोलकांची भेट घेतली.

Advertisement