Published On : Wed, Sep 4th, 2024
By Nagpur Today Nagpur News

अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल, ट्विट करत म्हणाले…

Advertisement

नागपूर : भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर मोक्का अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी अनिल देशमुखांनी गृहमंत्री असताना जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप आहे.

खुद्द प्रवीण मुंढे यांनी सीबीआयकडे तसा जबाब नोंदवला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढ झाली असून याच्याशी संबंधित प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर देशमुख यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

Gold Rate
Wednesday 15 Jan. 2025
Gold 24 KT 78,400 /-
Gold 22 KT 72,900/-
Silver / Kg 89,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

धन्यवाद… देवेंद्रजी फडणवीस! माझ्यावर सीबीआयकडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहेत. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता – न डगमगता मी भाजपच्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे, अशा शब्दांत अनिल देशमुखांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे, असेही देशमुख म्हणाले.

Advertisement