Advertisement
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.अनिल यांनी आज 11 सप्टेंबर रोजी वांद्रे येथे राहत असलेल्या त्यांच्या इमारतीवरून उडी मारून जीवन संपवले.
ही घटना सकाळी 9 वाजता घडली. या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. माहिती मिळताच मुंबई पोलीस अभिनेत्रीच्या घरी पोहोचले असून तपास करत आहेत.
मलायका आणि तिच्या कुटुंबासाठी हा खूप दुःखाचा आणि कठीण काळ आहे. मलायकाचा एक्स पती अरबाज खानही तिच्या दुःखात सहभगी झाला असून तिच्या घरी दाखल झाला आहे.मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा हे मूळचे पंजाबचे आहेत. अनिल अरोरा इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते.