नवी दिल्ली : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले.दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. येचुरी यांना फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
येचुरी यांच्यावर १९ ऑगस्टपासून उपचार केले जात होते. न्युमोनिया, छातीत संसर्ग झाल्याने ते रुग्णालयात दाखल झाले होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. ऍक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शनमुळे त्यांचं निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान सीताराम येचुरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव होते. १९९२ पासून ते सीपीआय (एम)च्या पॉलिट ब्युरोचे सदस्य होते. २००५ ते २०१७ अशी १२ वर्षे ते पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर होते. १९७४ मध्ये ते ते स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियामध्ये सहभागी झाले. त्यानंतर वर्षभरात त्यांनी सीपीआयएममध्ये प्रवेश केला.