Advertisement
नागपूर : दिघोरी येथील श्री संतकृपा प्रोव्हिजन या मोबाईल शॉपीमध्ये 35 ते 40 लाख रुपये किंमतीचे 80 हून अधिक मोबाईल फोन चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
ही घटना सकाळी ४ वाजताची असून तीन चोरट्यांनी शॉपचे शटर तोडून चोरी केल्याचे ससीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
आरोपींपैकी एकाने दुकानात घुसून मोबाईल घेऊन पळ काढला. याप्रकरणी दुकान मालक सचिन गावंडे यांनी हुडकेश्वर पोलिसांत फिर्याद दिली असून, त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.
पोलीस सध्या संशयितांची ओळख पटवून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यासाठी पुढील तपास सुरु केला आहे.