नागपूर : बांगलादेशहून ओमानला जाणाऱ्या विमानात एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला. या कारणामुळे विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. जिथे प्रवाशाला उपचारासाठी शहरातील किम्स-किंग्सवे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सध्या रुग्णावर उपचार सुरु आहे.
माहितीनुसार, बांगलादेशातील चितगाव येथून ओमानला जाणाऱ्या सलाम एअरवेजच्या आंतरराष्ट्रीय विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
प्रवासादरम्यान एका प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडल्याने विमान नागपूर विमानतळावर उतरले.
मोहम्मद खैर (३३) यांना प्रवासादरम्यान हृदयविकाराचे दोन झटके आले. त्यामुळे विमान कर्मचाऱ्यांनी तातडीने वैद्यकीय मदतीसाठी नागपूर विमानतळावर उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर किम्स-किंग्सवे हॉस्पिटलचे डॉक्टर तात्काळ तपासणीसाठी आले. त्यानंतर रुग्णाला किम्स-किंग्सवे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.