Published On : Fri, Sep 20th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तक दिनाची तयारी सुरू; भारतीय भिक्खू संघही आमंत्रित!

Advertisement

नागपूर: शहरातील दीक्षाभूमी येथे 12 ऑक्टोंबरला होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तक दिनानिमित्त तयारीला सुरुवात झाली आहे.

यादरम्यान होणाऱ्या मुख्य कार्यक्रमासह इतरही धम्म सोहळ्यास भारतातील सुविख्यात आणि अभ्यासू भारतीय भिक्खूंना आमंत्रित करण्यात येत आहे.

दीक्षाभूमी स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटे यांनी प्रसिध्दी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी दीक्षाभूमीवर मुख्य समारंभास दीक्षाभूमीवरील बौद्ध धम्माचा अभ्यास असणारे व धम्म कार्यात आपले अमूल्य आयुष्य वेचणारे भंतेना स्थान मिळावे या पवित्र हेतूने संपूर्ण भारतभर काम करणारे भन्ते दीक्षाभूमीवर यावे व बौद्धांना मार्गदर्शन करावे. यासाठी बौद्ध धम्म परिषदेसह मुख्य कार्यक्रमात निमंत्रित करण्यात येणार आहे.

Advertisement

‘हे’ भिक्खू होणार कार्यक्रमात सहाभागी –
या कार्यक्रमात ज्या भिक्खूंना निमंत्रित करण्यात येणार आहे यात भदंत आनंद (आग्रा उत्तर प्रदेश) भदंत प्रज्ञाशील (विश्वस्त महाबोधी महाविहार प्रबंधन कमिटी बोधगया) भदंत संघरत्न मानणे (पवनी भंडारा ) भंते ज्ञानज्योती (ताडोबा ) भंते ज्ञानदीप, भदंत प्रियदर्शी नागपूर, भंते धम्मकाया (उडीसा) भंते महापंत (नागपूर), भदंत सत्यशील महास्थवीर (नागपूर), भदंत हर्षबोधी (बोधगया), भदंत धम्मशिखर (बालाघाट),भंते मेत्तानंद, भदंत प्रज्ञानंद, (पणयासिरीथेरो), भदंत विनय (रक्षिक), भदंत चंद्रमणी (बोधगया), भदंत धम्म ज्योती (नालंदा), माताजी )कुशीनगर), भदंत धम्मसेना, भदंत पथीक (गुजरात), भदंत मौर्य बुध्दा (चेन्नई तामिळनाडू ) भदंत वरज्योती, भदंत आनंद (गुजरात), भदंत बोधी (पालो कलकत्ता), भदंत धम्मशरण (औरंगाबाद), भदंत संघधातू (गोंदिया), भदंत आनंद (कोल्हापूर), भदंत आयुपाल (मुंबई), भदंत धम्मधर (पुणे). या सर्व अतिथीगणांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती विलास गजघाटे यांनी दिली.