Published On : Wed, Sep 25th, 2024
By Nagpur Today Nagpur News

रामझुला अपघात प्रकरण;रितिका मालूचा अटकेचा मार्ग मोकळा,न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

Advertisement

नागपूर: रामझुला मर्सिडीज अपघात प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने बुधवारी, 25 सप्टेंबर रोजी रितिका उर्फ ​​रितू दिनेश मालू (39) हिचा जामीन अर्ज फेटाळला.न्यायालयांच्या या निर्णयामुळे रतिका मालूच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

न्यायाधीश आर.एस.पाटील (भोसले) यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी झाली. सुरुवातीला, तहसील पोलिसांनी 25 फेब्रुवारी 2024 रोजी मालूच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवला होता आणि त्याच दिवशी तिला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी जामीन मंजूर केला होता.

Gold Rate
Wednesday 12 March 2025
Gold 24 KT 86,400 /-
Gold 22 KT 80,400 /-
Silver / Kg 98,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मालूच्या अटकेची वाट पाहत असलेल्या पीडित कुटुंबांना आता कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे जलद कारवाईची अपेक्षा आहे. या प्रकरणाकडे मोठ्या प्रमाणावर लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. न्यायालयाने आरोपी मालू हीचा जामीन नाकारणे हे या प्रकरणातील न्याय सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जाते.

दरम्यान नागपुरातील राम झुला रेल्वे ओव्हर ब्रीजवर अपघाताची ही घटना 25 फेब्रुवारी रोजी रात्री घडली होती. रितू मालू आणि त्यांची मैत्रीण सीपी क्लबमध्ये गेल्या होत्या. तिथून दोघी मध्यरात्री एक ते दोन वाजेच्या दरम्यान मर्सिडीज कार ने घरी परतत असताना रामझुल्यावर रितिका यांनी कारचा वेग वाढविला आणि समोर दुचाकीवर जाणाऱ्या दोन तरुणांना जोरदार धडक दिली होती. यात मोहम्मद हुसेन आणि मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया या दोन तरुणांचा मृत्यू झाला होता.

Advertisement