Advertisement
नागपूर : विदर्भात मान्सून आता शेवटच्या टप्प्यात आला आहे.मात्र गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात पावसाने हजेरी लावली. गुरुवारी सुरू झालेला पाऊस शुक्रवारी सकाळपर्यंत सुरूच होता. केवळ नागपूरच नाही तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडला आहे.
तसेच या आठवड्यात चांगला पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने आधीच दिला होता. यावेळी हवामान खात्याचा हा इशारा तंतोतंत खरा ठरला.
नागपुरात गुरुवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. रात्रभर पाऊस सुरूच होता.आकाशात ढगाळ वातावरण कायम होते.
संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. याशिवाय सर्व नद्या, नाले, जलाशयही भरले आहेत.