Published On : Sat, Sep 28th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या अकादमी ऑफ मार्शल आर्ट खेळाडूंची चौथ्या शोटोकन चषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी

Advertisement

नागपूर: अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, आझाद नगर मेट्रो स्टेशन, अंधेरी (प) मुंबई येथे 20 सप्टेंबरपासून आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय शोटोकन कराटे-दो डू ऑर्गनायझेशन चॅम्पियनशिपच्या विविध प्रकारात ॲकॅडमी ऑफ मार्शल आर्ट, म्हाळगी नगर शाखा नागपूरच्या खेळाडूंनी सहभाग घेतला.

या स्पर्धेत अकादमीच्या महिला व पुरुष खेळाडूंनी भाग घेतला.अकादमी ऑफ मार्शल आर्टचे प्रमुख शिरन राकेश बोपचे, प्रशिक्षक सेन्सास प्रज्वल चौधरी यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

Today’s Rate
Sat 16 Nov. 2024
Gold 24 KT 74,500 /-
Gold 22 KT 769,300 /-
Silver / Kg 89,300/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विजयी खेळाडूंची नावे –

कृशिका करडेने- काटा सुवर्ण, कुमिते सुवर्ण, मृण्मयीने तरंग काटा सुवर्ण कुमिते सुवर्ण, नक्षत्र घुटे — कुमित सुवर्ण कास्य, मंगळ दधे — काटा सुवर्ण कुमिते रौप्य, वंश ढोके — काटा सुवर्ण, वेदांत — काटा सुवर्ण कुमिते रौप्यपदक जिंकले .

हिमानी नाखळे – काटा कांस्य कुमितेत सुवर्ण, ठक्के – काटा रौप्य कुमित सुवर्ण, वैष्णवी तिवसकर – काटा सुवर्ण कुमिते रौप्य, दर्शन सिंग – काटा रौप्य कुमिते सुवर्ण, हार्दिक हलगडे – काटा कांस्य कुमिते सुवर्ण, केतन – कुमिते सुवर्ण काटा रौप्य , शीहान बोडखे — काटा रौप्य, कुमिते रौप्य, अनन्या तापेकर — काटा कांस्य, कुमिते कांस्य, आयुष अंबाडकर — काटा रौप्य, पवन निकम — काटा कांस्य कुमित कांस्य पदक जिंकले.दरम्यान या स्पर्धेत जपान, नायजेरिया, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका येथील खेळाडू सहभागी झाले होते.

Advertisement