Published On : Mon, Sep 30th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील वर्धा रोडवर भीषण अपघात; मिक्सर वाहनाची कंटेनरसह कारला धडक; एकाचा मृत्यू

Advertisement

नागपूर : वर्धा मार्गावरील जामठा टी पॉइंट येथे आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास नागपूरच्या दिशेने येणाऱ्या एका मिक्सर ट्रकने समोरून जाणाऱ्या कंटेनरला धडक दिली. त्यानंतर विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारलाही मिक्सरची धडक बसली. या अपघातात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

माहितीनुसार, रामलाल गोपीलाल चव्हाण (वय 57, रा. गुढा, भिलवाडा, राजस्थान) असे मृतकाचे नाव आहे. तो ट्रक चालक असल्याची माहिती आहे. मृतक नेमके कोणते वाहन चालवत होता, याचा तपास हिंगणा पोलीस करत आहेत. या घटनेची तक्रार फिर्यादी कार चालक स्वप्नील हलके( रा. मानेवाडा) याने दिली आहे.

Advertisement
Wenesday Rate
Saturday 28 Dec. 2024
Gold 24 KT 76,600/-
Gold 22 KT 71,200/-
Silver / Kg 82,200/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्वप्नील त्याच्या कारने जामठा चौकात आला आणि वर्धा लेनवरून नागपूर रोडला यू-टर्न घेण्यासाठी थांबला. त्याचवेळी नागपूरकडे जाणाऱ्या लेनवर एक कंटेनरही चौकात आला आणि तोही चौकातून यू-टर्न घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या रोडवरगेला. या चौकात येताच नागपूरच्या दिशेने येणाऱ्या लेनमधून कंटेनरच्या पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या एका मिक्सरने कंटेनरला जोरदार धडक दिली. सोबतच वर्धा लेनवर उभ्या असलेल्या फिर्यादीच्या गाडीच्या पुढील भागात जोरदार धडक दिली.

यात कार चालक व अन्य एक जण जखमी झाला. पहाटेच्या सुमारास या मार्गावरून जाणाऱ्या काही वाहनचालकांनी पोलिसांना माहिती दिली.तसेच दोन्ही जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

माहिती मिळताच हिंगणा पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रशांत ठवरे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय वाघ व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. सर्व वाहने रस्त्याच्या कडेला हलवण्यात आली आणि वाहतूक सुरळीत सुरू झाली. या अपघातात मिक्सर वाहनाच्या चालकाने बेदरकारपणे व भरधाव वेगात वाहन चालवून फिर्यादीच्या गाडीचे व अन्य कंटेनरचे नुकसान केल्याचे समोर आले आहे.

Advertisement