नागपूर: राज्याच्या उपराजधानीत हत्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.अंबाझरी पोलीस स्टेशन अंतर्गत किरकोळ वादातून तीन मित्रांनी मिळून एकाची हत्या केल्याची माहिती आहे.सागर नकुल नागले उर्फ टूनां (वय 27 वर्ष रा. सुदाम नगरी पांढराबोडी) असे मृतक तरुणाचे नाव आहे. तर वीर विनोद थापा (वय अठरा वर्ष, रा.सुदाम नगरी ),अजित संतन नेताम (वय 26, सुदाम नगरी), सुरेश मनोहर यादव (25 वर्ष रा. सुदाम नागरी)असे आरोपीचे नाव आहे.अंबाझरी पोलिसांनी तिघांनाही अटक करून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनुसार,सुदाम नगरी पांढरा बोडी हनुमान मंदिराच्या जवळ श्री बंटी देविदास उईके यांच्या घरात काल रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली.
आरोपी आणि मृतक
दारू पीत असताना मृतक सागर याने आरोपी वीर याच्या मामे बहिणी सोबत अफेअर असून बहिणी सोबत संबंध प्रस्थापित केल्याचे म्हटले. असे बोलल्याने त्याचा आरोपी वीरला राग येऊन त्याने सोप्याखाली ठेवलेला सिमेंट चा गट्टू उचलून मृतकाच्या डोक्यात मारला व त्यानंतर आरोपी अजित आणि सुरेश यांनी सुद्धा गट्टू उचलून डोक्यात वारंवार मारून सगरलात ठार मारले.तसेच घटनेनंतर पसार झाले.या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.
अंबाझरी पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर पंचनामा करण्यात आला आहे. घटनास्थळावरून साहित्य जप्त केले आहे.या घटनेतील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.तसेच मृतदेह मेडिकल येथे रवाना करण्यात आला.तसेच या प्रकरणी पुढील तापस सुरू करण्यात आला आहे.