Published On : Thu, Oct 3rd, 2024
By Nagpur Today Nagpur News

दीक्षाभुमीवर आवश्यक सुविधांची तयारी पूर्ण करा

आयुक्तांनी घेतला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीचा आढावा
Advertisement

नागपूर: धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने दीक्षाभूमीवर येणा-या लाखो बौद्ध अनुयायांच्या सोयीसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे विविध सुविधांची व्यवस्था करण्यात येते.या सर्व आवश्यक सुविधांची तयारी लवकरात लवकर पूर्ण करा असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने दीक्षाभूमीवरील सुविधांचा मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरूवारी (ता.३) आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभा कक्षात झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल,अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर,उपायुक्त श्रीमती विजया बनकर, उपायुक्त सर्वश्री प्रकाश वराडे, मिलिंद मेश्राम, डॉ. गजेंद्र महल्ले, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी,

Advertisement
Today's Rate
Wed 18 Dec. 2024
Gold 24 KT 76,900/-
Gold 22 KT 71,500/-
Silver / Kg 89,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

परिवहन व्यवस्थापक श्री. गणेश राठोड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बी.पी. चंदनखेडे, सहायक आयुक्त सर्वश्री अशोक घारोटे, प्रमोद वानखेडे, उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार, कार्यकारी अभियंता सर्वश्री राजेंद्र राठोड,रवींद्र बुंधाडे, श्रीकांत वाईकर आदी उपस्थित होते.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरातून लाखोंच्या संख्येत बौद्ध अनुयायी नागपूर शहरातील दीक्षाभूमीला भेट देतात. या सर्व नागरिकांच्या सोयीसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे १० ते १५ ऑक्टोबर या कालावधीमध्ये सर्व मुलभूत सुविधांची व्यवस्था करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी बैठकीमध्ये दिले. नागरिकांची गैरसोय होउ नये तसेच त्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करणे, संपूर्ण परिसरात स्वच्छता राखणे, सर्वत्र विद्युत पुरवठा करणे, पिण्याचे पाणी, शौचालय, परिवहन सेवा या सर्व सुविधा सुरळीतपणे चालविल्या जातील, या दृष्टीने नियोजन करण्याचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्देशित केले. दीक्षाभूमीवर येणाया मार्गांवर मुख्य चार ठिकाणी अनुयायांच्या सेवेसाठी मनपाच्या आरोग्य तपासणी केंद्रांची व्यवस्था केली जाणार आहे. याशिवाय संपूर्ण मार्गावर पिण्याच्या पाण्याचे १४० नळांची व्यवस्था असेल. याशिवाय तात्पुरत्या स्वरुपात ९०० शौचालयांची देखील व्यवस्था नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे. याशिवाय ४ फिरते प्रसाधनगृहांची देखील सोय असेल. संपूर्ण दीक्षाभूमी परिसरात स्वच्छतेसाठी ६६४ स्वच्छता कर्मचारी अहोरात्र स्वच्छतेची सेवा देण्यासाठी सज्ज आहेत.

बौद्ध अनुयायांच्या निवासासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) परिसरामध्ये तसेच अंध विद्यालयाच्या परिसरामध्ये निवास केंद्र उभारण्यात येणार आहेत. आपात्कालीन परिस्थितीत दीक्षाभूमीच्या जवळच्या भागातील मनपाच्या शाळांमध्ये देखील निवासाची व्यवस्था केली जाणार आहे. संपूर्ण परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेर्यांची निगराणी असेल. आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मनपाचे अग्निशमन व आपात्कालीन सेवा पथक तैनात करण्यात आलेले आहेत. परिवहन विभागाद्वारे बस स्थानक, रेल्वे स्टेशन येथून दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस कामठी आणि इतर महत्वाच्या स्थळी जाण्यासाठी विशेष बसेसची देखील व्यवस्था केली जाणार आहे. काछीपुरा चौक परिसरात तात्पुरत्या स्वरूपात मनपाचे आपली बस स्थानक उभारण्यात येणार आहे. दीक्षाभूमी परिसरातील सर्व मार्गांवरील खड्डे बुजविणे तसेच अन्य कामासाठी खोदकाम करण्यात आलेली असल्यास तात्काळ बुजवून मार्ग पूर्ववत करण्याचे निर्देशही मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

विशेष म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या सर्व व्यवस्थेची माहिती देण्यासाठी तसेच नागरिकांना आवश्यक मदतीसाठी दीक्षाभूमी परिसरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊसाठे यांच्या स्मारकाशेजारी मनपाचे नियंत्रण कक्ष २४ तास मदतीसाठी तत्पर असणार आहेत. याशिवाय अंबाझरी तलावावर अनुयायी मोठ्या संख्येत आंघोळीसाठी जात असतात या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन विभागाची चमू, बोट तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन चमू तैनात करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले. दीक्षाभूमीच्या परिसरात लावण्यात येणा-या स्टॉलवर कुठेही सिलेंडर अथवा तत्सम ज्वलनशील वस्तूंचा वापर होउ नये याबाबत विशेष काळजी घेण्याचे निर्देशही मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

Advertisement