नागपूर : डेक्कन इन्फ्रा ग्रुपच्या नावाखाली भूखंड विक्रीच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या स्वप्निल खांडेकर (४२) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकांना कमी किंमतीत जमीन उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या खांडेकर याचा घोटाळा उघडकीस आला आहे.
खांडेकर याचे इंदिरा आर्केड, गांधी चौक येथे डेक्कन इन्फ्रा ग्रुपच्या नावाने कार्यालय आहे. कामठी रोड येथे राहणारे अश्विन अनिल दुबे यांनी 2015 मध्ये सदर स्थित डेक्कन इन्फ्रा ग्रुपच्या स्वप्नीलकडून गांगलडोह, तहसील काटोल आणि मौजा सेलगाव, जिल्हा वर्धा येथे 2 भूखंड खरेदी केले. त्यासाठी ९० हजार रुपये किंमत निश्चित करण्यात आली होती.
कराराच्या वेळी अश्विनने हप्त्याने पैसे देऊ असे सांगितले होते. 2019 पर्यंत त्याने स्वप्नीलला संपूर्ण 90,000 रुपये दिले पण त्यानंतर तो रजिस्ट्री करण्यास टाळाटाळ करू लागला.
स्वप्नीलने 5 वर्षे दिरंगाई केल्यानंतर अश्विनने त्याच्यासोबत केलेल्या फसवणुकीची तक्रार पोलिसांकडे केली.मात्र ठगबाज स्वप्निल खांडेकर हा फरार असून पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
ठगबाज स्वप्निल खांडेकरविरोधात पाहिलेही गुन्हे दाखल-
भूखंड विक्रीच्या बहाण्याने लोकांची फसवणूक करणाऱ्या ठगबाज स्वप्निल खांडेकरविरोधात या अगोदरही अजनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोर- गरीब जनतेला विश्वासात घेऊन त्यांना कमी किंमतीत जमीन उपलब्ध करू देण्याचे खोटे आश्वासन स्वप्निल खांडेकर देत होता. मात्र आता त्याच्या कृत्याचा भंडाफोड झाला असून अशाच प्रकारचे अजून अनेक प्रकरण समोर येण्याची शक्यता आहे.