Published On : Sat, Oct 5th, 2024
By Nagpur Today Nagpur News

एलआयसी-ऑटोमोटिव्ह चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण

डबलडेकर उड्डाणपूल नागपूरसाठी ठरणार वरदान-केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांना विश्वास
Advertisement

नागपूर – नागपूरमधील पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल झालेला आहे. हे शहर हळूहळू बदलत आहे. त्यात आता एलआयसी ते ऑटोमोटिव्ह चौक या डबलडेकर उड्डाणपुलाची भर पडली आहे. हा उड्डाणपूल नागपूरकरांसाठी वरदान ठरणार आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) येथे व्यक्त केले.

तांत्रिकदृष्टया अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजला जाणाऱ्या एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौक या ५.६७ किमी लांबीच्या डबलडेकर उड्डाणपूलाचे लोकार्पण ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे, माजी आमदार सुधाकर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय महामेट्रोचे संचालक (प्रकल्प) श्री. त्यागी, संचालक (स्ट्रॅटेजिक प्लानिंग) अनिलकुमार कोकाटे यांचीही यावेळी उपस्थिती होती. नागपूरची ओळख उड्डाणपुलांचे शहर अशी होत असल्याचेही ना. श्री. गडकरी म्हणाले. ‘आशियात कुठेही नाही असा स्टेट ऑफ आर्ट उड्डाणपूल आपल्या शहरात निर्माण झाल्याचा मला अभिमान आहे. हा विक्रम करण्याचे भाग्य लाभले, याचा विशेष आनंद आहे. त्यासाठी नागपूरकर जनतेचेही अभिनंदन,’ असेही ना. श्री गडकरी म्हणाले.

Advertisement
Wenesday Rate
Wed 25 Dec. 2024
Gold 24 KT 76,300/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

‘एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौक डबलडेकर उड्डाणपुलामुळे नागपूर विमानतळ ते कामठी हे अंतर अवघ्या २० मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. वर्धा मार्गावरील डबलडेकर आणि पारडी चौकातील १२०० कोटींचा उड्डाणपूल यांनी नागपूरची शान वाढवली होती. आता त्याहून वेगळा आणि भव्य असा हा नवीन पूल नागपूरकरांच्या सेवेत आला आहे. या पुलाच्या निर्माणासाठी आलेल्या अडचणी दूर करण्याचे काम जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी केले. तर मेट्रोने अत्यंत अत्यंत कमी खर्चात पूल साकारला आहे,’ याचा ना. श्री. गडकरी यांनी आवर्जुन उल्लेख केला.

डबलडेकर उड्डाणपुलाची ठळक वैशिष्ट्ये
– सर्वाधिक लांबीचा हा चारपदरी डबलडेकर उड्डाणपूल सिंगल कॉलम पिअरवर उभा आहे
– प्रकल्पाची किंमत ५७३ कोटी आहे
– उड्डाणपुलांवर गड्डीगोदाम चौक, कडबी चौक, इंदोरा चौक, नारी रोड, ऑटोमोटिव्ह चौक ही पाच मेट्रो स्थानके बांधण्यात आली आहेत
– गड्डीगोदाम येथील गुरुद्वाराजवळ 1650 वजन क्षमतेचा स्टीलचा पूल तयार करण्यात आला आहे
– गड्डीगोदाम येथे खाली रस्ता, वर रेल्वेचा ट्रॅक, त्यावर पूल आणि त्याच्याही वर मेट्रो आहे
– या उड्डाणपुलामुळे कामठी मार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Advertisement