मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यभरात दौरे सुरु केले आहे. नुकतेच राहुल गांधी अजय तुकाराम सनदे आणि अंजना तुकाराम सानदे यांच्या महाराष्ट्रातील कोल्हापूर घरी जेवायला पोहोचले.
यावेळी राहुलने किचनमध्ये स्वयंपाक करतानाही हात आजमावला. राहुल गांधी म्हणाले, आजही दलित किचनबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. शाहू पटोले यांनी म्हटल्याप्रमाणे,दलित काय खातात हे कोणालाच माहीत नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींनीही हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जेवताना गांधी जास्त मिरची खात नसल्याचे सांगतात.
या दरम्यान ते सानदे यांना जेवणात किती मिरची टाकली… असे म्हणताना दिसत आहे.
व्हिडिओ शेअर करताना राहुलने लिहिले की, आजही फार कमी लोकांना दलित किचनबद्दल माहिती आहे. शाहू पटोले जी म्हटल्याप्रमाणे दलित काय खातात हे कोणालाच माहीत नाही. ते काय खातात, ते कसे शिजवतात आणि त्याचे सामाजिक आणि राजकीय महत्त्व याबद्दल उत्सुकतेने मी अजय तुकाराम सानदे आणि अंजना तुकाराम सानदे यांच्यासोबत एक दुपार घालवली. त्यांनी मला आदरपूर्वक कोल्हापूर, महाराष्ट्रातील त्याच्या घरी बोलावले आणि स्वयंपाकघरात मदत करण्याची संधी दिली. आम्ही मिळून हरभऱ्याची भाजी आणि वांग्याची तूर डाळ तयार केली.
संविधानाने बहुजनांना वाटा आणि अधिकार दिले आहेत. त्या संविधानाचे आम्ही रक्षण करू. पण समाजात खरी सर्वसमावेशकता आणि समानता तेव्हाच शक्य होईल जेव्हा प्रत्येक भारतीय बंधुत्वाची भावना मनात ठेवून प्रयत्न करेल, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.
दलित किचन के बारे में आज भी बहुत कम लोग जानते हैं। जैसा शाहू पटोले जी ने कहा, “दलित क्या खाते हैं, कोई नहीं जानता।”
वो क्या खाते हैं, कैसे पकाते हैं, और इसका सामाजिक और राजनीतिक महत्व क्या है, इस जिज्ञासा के साथ, मैंने अजय तुकाराम सनदे जी और अंजना तुकाराम सनदे जी के साथ एक दोपहर… pic.twitter.com/yPjXUQt9te
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 7, 2024
गांधी परिवाराचा दलित कुटुंबीयांशी असलेला स्नेह समोर –
कोल्हापुरातील उचगावच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राहणारे टेम्पोचालक अजयकुमार सनदे यांच्या घरी जाऊन गांधी यांनी स्वत: भाज्या बनवत सनदे कुटुंबीयांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला. यानिमित्ताने गांधी परिवाराचा दलित कुटुंबीयांशी असलेला स्नेह पुन्हा एकदा समोर आला.
आमदार सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांनी उचगावमधील भेटीचे नियोजन केल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले. राहुल गांधी स्वत: भाज्या तयार करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार शाहू छत्रपती, आमदार बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, विश्वजीत कदम, आदी नेते बाजूच्या घरात थांबले होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्या नीता हावळ, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मंगल वळकुंजे, गणेश भोसले, यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
राहुल गांधींच्या भेटीने सनदे कुुटुंबीय भारावले-
राहुल गांधी यांच्या अनपेक्षित भेटीने आम्ही भारावून गेलो. त्यांनी स्वत: भाज्या तयार करून आमच्यासोबत जेवणाचा आनंद घेतला. आम्हाला त्यांच्या हातच्या भाज्या खाण्याची संधी मिळाली. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान आणि संविधानाबद्दल आमच्याशी चर्चा केली. हा क्षण आमच्या कुटुंबासाठी अविस्मरणीय आहे, असे अजयकुमार सनदे म्हणाले.