नागपूर: रामटेक तहसीलच्या पाओनी प्रादेशिक परिक्षेत्रात रविवारी संध्याकाळी राजकुमार दशरथ खंडाते या 58 वर्षीय मेंढपाळाचा वाघाने बळी घेतला. हा हल्ला गोंडी फाटा तलाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाणवठ्याजवळ असलेल्या राखीव वन कंपार्टमेंट क्रमांक 750 मध्ये जंगलात खोलवर झाला.
देवळापार तालुक्यातील खानोरा येथे राहणारे खंडाते हे गुरे चारण्यासाठी जंगलात गेले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. खंडाते हे गोंडी फाटा तलावाजवळील त्यांच्या शेतजमीन असलेल्या परिसरात गुरे चरत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले. ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली. वाघाच्या हल्ल्यात मेंढपाळाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले. त्यानंतर घटनेची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली.
आरएफओ ऋषिकेश पाटील य त्यांच्या पथकासह देवळापार पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळाचा पंचनामा केला. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी देवळापार ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
वन विभागाने पीडित व्यक्तीच्या मुलाला हंगामी वनमजूर म्हणून कामावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि वाघ आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्यांना 25 लाख रुपयांच्या पॅकेजचा भाग म्हणून सोमवारी सकाळी 10 लाख रुपयांचा धनादेश कुटुंबाला सुपूर्द केला जाईल,अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.
या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत स्थानिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी वनविभागाने पावले उचलणे अपेक्षित आहे.