Published On : Mon, Oct 7th, 2024
By Nagpur Today Nagpur News

व्हिडीओ; नागपुरात डेक्कन इन्फ्रा ग्रुपचा भूखंड विक्री घोटाळा,पोलीस निरीक्षक मनीष ठाकरेंचे जनतेला तक्रार देण्याचे आवाहन !

ठगबाज स्वप्निल खांडेकर फरार
Advertisement
स्वप्निल खांडेकर

फरार आरोपी ठकबाज (420) स्वप्निल खांडेकर , डेक्कन इंफ़्रा ग्रुप डायरेक्टर

नागपूर : डेक्कन इन्फ्रा ग्रुपच्या नावाखाली भूखंड विक्रीच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या स्वप्निल खांडेकर (४२) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकांना कमी किंमतीत जमीन उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या खांडेकर अद्यापही फरार असून सादर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. आता या प्रकरणाशी संबंधित कोणालाही तक्रार द्यायची असेल तर त्यांनी समोर येऊन जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी, असे आवाहन सदर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे यांनी केले.

खांडेकर याचे इंदिरा आर्केड, गांधी चौक येथे डेक्कन इन्फ्रा ग्रुपच्या नावाने कार्यालय आहे. कामठी रोड येथे राहणारे अश्विन अनिल दुबे यांनी 2015 मध्ये सदर स्थित डेक्कन इन्फ्रा ग्रुपच्या स्वप्नीलकडून गांगलडोह, तहसील काटोल आणि मौजा सेलगाव, जिल्हा वर्धा येथे 2 भूखंड खरेदी केले. त्यासाठी 90 हजार रुपये किंमत निश्चित करण्यात आली होती. कराराच्या वेळी अश्विनने हप्त्याने पैसे देऊ असे सांगितले होते. 2019 पर्यंत त्याने स्वप्नीलला संपूर्ण 90,000 रुपये दिले पण त्यानंतर तो रजिस्ट्री करण्यास टाळाटाळ करू लागला.

Advertisement
Wenesday Rate
Saturday 28 Dec. 2024
Gold 24 KT 76,600/-
Gold 22 KT 71,200/-
Silver / Kg 82,200/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्वप्नीलने 5 वर्षे दिरंगाई केल्यानंतर अश्विनने त्याच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. मात्र ठगबाज स्वप्निल खांडेकर हा फरार असून सदर पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

गबाज स्वप्निल खांडेकरविरोधात पाहिलेही गुन्हे दाखल-
भूखंड विक्रीच्या बहाण्याने लोकांची फसवणूक करणाऱ्या ठगबाज स्वप्निल खांडेकरविरोधात या अगोदरही अजनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोर- गरीब जनतेला विश्वासात घेऊन त्यांना कमी किंमतीत जमीन उपलब्ध करू देण्याचे खोटे आश्वासन स्वप्निल खांडेकर देत होता. मात्र आता त्याच्या कृत्याचा भंडाफोड झाला असून अशाच प्रकारचे अजून अनेक प्रकरण समोर येण्याची शक्यता आहे.

हाय वे पर डेक्कन ग्रुप का बोर्ड गड़ाकर आरोपी स्वप्निल खांडेकर करता था जालसाजी .

पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे यांनी पीडित जनतेला तक्रार करण्याचे आवाहन-
ठगबाज स्वप्निल खांडेकर यांनी जर कोणाची फसवणूक केली असेल तर सदर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे यांनी पीडित जनतेला त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देण्याचे आवाहन केले आहे. ठगबाज स्वप्नील खांडेकर याने गागपूर व्यतिरिक्त पुणे शहर येथे सुद्धा अशाच प्रकारची ठगबाजी केली आहे. पोलिसांनी सखोल तपास केला तर बनावट दस्तावेज, बनावट शासकीय रबर स्टैम्पचा नवीन घोटाळा समोर येण्याची शक्यता नाकारता येत् नाही. चर्चित माहदेव लँड डेव्हलपर्स पेक्षा ही मोठा करोडोचा घोटाळा पुढे येऊ शकतो.

खुद की जमीन बताकर , फ़ार्म हाऊस प्रोजेक्ट खोलने का झासा देकर करता था जनता को गुमराह

स्थानिक अखबारो मे विज्ञापन देकर गरीब जनता की करता था ठगी

Advertisement