Advertisement
नागपूर : दीक्षाभूमीवर 69व्या धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायांनी येण्यास सुरुवात झाली आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव परिसरात 2000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर ड्रोन आणि कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक कोपऱ्यावर नजर ठेवली जाईल.
धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यासाठी दीक्षाभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी येण्याची अपेक्षा आहे. यानिमित्ताने सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, दीक्षाभूमीचे छावणीत रूपांतर झाले आहे.
अनुयायांची गर्दी हाताळण्यासाठी हजारो पोलीस तैनात करण्यात आले असून प्रत्येक चौकात कडक पाळत ठेवण्यात आली आहे.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बॉम्बशोधक पथक आणि स्निफर डॉगही तैनात करण्यात आले आहेत.