नागपूर : आयडीबीआय बँकेच्या हीरक महोत्सवी समारंभाचा एक भाग म्हणून, महानगर पालिकेच्या जी.एम. बनाटवाला इंग्रजी उच्च प्राथमिक शाळेमध्ये डेस्क बेंचचे उद्घाटन आणि सुपूर्द केले, आज हा उपक्रम आयडीबीआय बँकेच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) कार्यक्रम अंतर्गत सह्याद्री फाउंडेशनच्या एनजीओ च्या सहकार्याने आयोजित करण्यात आला, शासकिय शाळामध्ये वंचित विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दर्जा वाढविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
आयडीबीआय बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक आणि झोनल ऑफिसर, श्रीकांत तिरपुडे यांचे हस्ते हा कार्यक्रम घेण्यात घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा चे शिक्षण विभागाचे संयोजक भारत गोसावी होते, कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अखिलेश मिश्रा, आयडीबीआय बँकेचे उप विभागीय प्रमुख, श्री. अनुराग सिंग, प्रादेशिक अधिकारी, श्री वाय. प्रताप कुमार, उपमहाव्यवस्थापक, IDBI बँक, श्री. गिरीश गुबरे, सहायक महाव्यवस्थापक, IDBI बँके, आणि जी एम बनटवाला उच्च प्रायमरी शाळेच्या प्राचार्या श्रीमती ममता प्रजापती, हायस्कूल चे प्राचार्य संकुलावर व इंचार्ज शिक्षिका मलिंदर कौर लांबा उपस्थित होते.
तसेच सह्याद्री फाउंडेशनचे संचालक श्री. विजय क्षीरसागर, विकास पाटील, धीरज उमाटे, सृष्टी पुनपसागर, सावित्री ठेंगे, संदीप वासनिक, हेमंत पांढराम, सतीश माटे या समारंभाला उपस्थित होते, श्रीकांत तीरपुडे यांनी IDBI बँकेच्या CSR उपक्रमांतर्गत शालेय पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी च्या उपक्रमाबाबत माहिती दिली. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शिकण्याची परिस्थिती सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
IDBI बँकेचे CSR उपक्रम, विशेषत: शिक्षण आणि पायाभूत सुविधांवर केंद्रित असलेले, वंचित विद्यार्थ्यांना उत्तम संसाधने आणि सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्या शिकण्याच्या अनुभवावर सकारात्मक प्रभाव पाडणे हे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाचा शाळेच्च्च्या विद्यार्थ्यांना फायदा होईल अशी अपेक्षा भारत गोसावी यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमांचे प्रास्ताविक विजय क्षिरसागर यांनी, कार्यक्रम संचालन शिक्षिका उषा सिंह व आभार प्रदर्शन ममता प्रजापती यांनी केले.