नागपूर: शहरात चाकूचा धाक दाखवून ठिकठिकाणी दरोडे टाकणाऱ्या आरोपींना वाठोडा गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.कुख्यात सराईत गुन्हेगार अफसर अंडा हा अद्यापही फरार असून पोलीसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे, पोलीस उपायुक्त (डीसीपी) परिमंडळ ४- रश्मिता राव यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिली.
कुणाल सुरेश हेमणे ( वय २७ वर्ष रा. प्लॉ.नं. १९४, आझाद नगर, बिडगाव पोलीस ठाणे वाठोडा),विशाल उर्फ फल्ली पृथ्वीलाल गुप्ता ( वय २२ वर्ष रा. प्लॉ.नं. १४९, श्रावण नगर, वाठोडा),सुजीत भाऊराव घरडे (वय २३ वर्ष रा. रामनगरी, प्रधानमंत्री आवास योजना समोर, पो.ता.वाठोडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.तर अफसर अंडा नावाचा आरोपी फरार आहे. पोलिसांनी झडतीत आरोपींकडून दोन पिस्तूल, जिवंतकाडतूस व दोन धारदार शस्त्रसहित कार जप्त केली आहे.
माहितीनुसार, फिर्यादी आरिफ इनायत खान पठाण (वय २८ वर्षे राहणार प्लॉट नं. ४४, आलिशान नगर, जिजामाता नगर ४, आला हजरत फर्जाना मस्जिद जवळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १२ ऑक्टोबरला सदर आरोपींनी त्याला अडवून ऋषी खोसला याचे मर्डर केसमधील घेतलेल्या सुपारीचे पैश्यामधील १० हजार रुपये देण्यास भाग पाडले. इतकेच नाही तर आरिफ पठाण यांच्या वडील व पत्नील शिवीगाळ केली. यानंतर आरिफने आरोपी विरोधात वाठोडा पोलीस स्टेशमध्ये तक्रार दाखल केली.
महत्त्वाचे म्हणजे प्रकरणातील फिर्यादी आरिफ इनायत खान पठाण हा देखील ऋषी खोसला मर्डर केसमधील आरोपी आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार पोलीसांनी सदर तीन आरोपींना हिंगणा परिसरातून अटक केली. वाठोडा पोलीसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. सर्व आरोपींना १९ तारखेपर्यंत पीसीआर मिळाला असल्याची माहिती रश्मिता राव यांनी दिली.