Advertisement
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. 20 नोव्हेंबर 2024 ला निवडणूक होणार आहे तर 23 नोव्हेंबर 2024 ला निकाल लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदावरून एक मोठं वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत एक मोठं विधान केलं आहे.
जयंत पाटील यांनी उद्याचा महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी घ्यावी असं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे.
राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगली येथील सांगता सभेत शरद पवार हे बोलत होते. त्यामुळे महाविकास आघाडीकडून जयंत पाटील हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.