Published On : Fri, Oct 18th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूर पोलिसांचे ‘ऑपरेशन थंडर’; अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आरोपींवर ठेवणार ‘वॉच’

अवघ्या 6 तासांत 153 आरोपींना अटक

नागपूर. अंमली पदार्थांशी संबंधित प्रकरणावर महत्त्वपूर्ण कारवाई करताना नागपूर शहर पोलिसांनी आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या नेतृत्वाखाली “ड्रग्ज-मुक्त नागपूर” मोहिमेचा भाग म्हणून “ऑपरेशन थंडर” राबविण्यात आले आहे. नागपूरला अधिक सुरक्षित आणि अंमली पदार्थमुक्त बनविण्याच्या उद्देशाने हे ऑपरेशन राबविण्यात येत आहे.

17 ऑक्टोबर 2024 रोजी मध्यरात्री ते सकाळी 6 वाजेपर्यंत झालेल्या या उपक्रमात वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि नागपूर शहर पोलिसांच्या विविध तुकड्यांमधील अधिका-यांनी कारवाई करत 2020 ते 2024 दरम्यानच्या अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना लक्ष्य केले.

Gold Rate
Wednesday 05 Feb. 2025
Gold 24 KT 84,400 /-
Gold 22 KT 78,500 /-
Silver / Kg 96,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यापूर्वी नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आणि तपास करण्यासाठी पोलिस स्टेशन आणि गुन्हे शाखेच्या युनिट्समधून पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी घरोघरी झडती घेतली, रेकॉर्डची छाननी केली आणि संशयितांचा ठावठिकाणा तपासला. काही संशयित मृत झाल्याचे आढळले तर काही तुरुंगात होते आणि इतरांनी एकतर शहर सोडले किंवा त्यांची निवासस्थाने रिकामी केली. शोध सुरू ठेवण्यासाठी, या फरार व्यक्तींना शोधण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

या कारवाईदरम्यान अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांशी संबंधित एकूण 153 जणांना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी नागपूर शहर गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले. कोणतेही संभाव्य गुन्हेगारी नेटवर्क किंवा लिंक ओळखण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्यांचे मोबाईल फोन तपासले. त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आणि त्यांचे तपशील पोलिस डेटाबेसमध्ये पूर्णपणे अद्ययावत करण्यात आले.

ही संपूर्ण कारवाई आयुक्त सिंघल यांच्या नागपूर शहराचा अमली पदार्थमुक्त शहर बनविण्याच्या संकल्पनेला अनुसरून होती. अद्ययावत माहितीसह, अधिकाऱ्यांकडे आता या गुन्हेगारांवर एक सर्वसमावेशक डेटाबेस आहे. ज्यामुळे भविष्यातील गुन्ह्यांच्या बाबतीत त्यांच्या गुन्हेगारी इतिहासामुळे आरोपींचा शुद्ध जलद गतीने घेतला जाईल.

तत्पूर्वी नागपूर पोलिसांनी 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अंमली पदार्थांशी संबंधित प्रकरणात 197 केस दाखल केले असून 261 आरोपींना अटक केली. या सर्व आरोपींकडून 3 कोटी 60 लाख 6 हजार 430 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. यात गांजा,ब्राऊन शुगर, चरस,कोकीन,एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स,डोडा,भांग यासारख्या अंमली पदार्थांचा समावेश आहे.

Advertisement