नागपूर : विदर्भात थंडीचा जोर वाढला आहे.अमरावती, यवतमाळ आणि गोंदियामध्ये तापमान 18 अंशांपर्यंत घसरले आहे, तर नागपुरात तापमान 20 अंशांपर्यंत घसरले आहे.
येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असून त्यामुळे थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
गुरुवारी नागपुरात सकाळची सुरुवात गुलाबी थंड आणि गार वाऱ्याने झाली. नागपुरात आज सकाळचे तापमान 20.1 अंशांवर पोहोचले आहे. जे या हंगामातील सर्वात कमी तापमान आहे.
नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्येही तापमानात घट झाली आहे. अमरावती, यवतमाळ, गोंदिया येथे आज सकाळच्या तापमानाची नोंद 18 अंशांवर झाली. तर अकोला 21. 9 अंश, बुलढाणा 23 अंश, भंडारा 21 अंश, वर्धा 20 अंशांसह इतर सर्व जिल्ह्यांत तापमान 20 अंशांच्या आसपास आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार विदर्भात चारही दिशांनी वारे वाहत आहेत. त्यामुळे तापमानात घट होऊ लागली आहे. दोन-तीन दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे