नागपूर : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्व राजकीय पक्ष उमेदवारांच्या यादीची घोषणा करत आहे. महविकास आघाडीतून शरद पवार आणि उध्दव ठाकरेंच्या पक्षानंतर काँग्रेसनेदेखील आपल्या उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये 48 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसने पुन्हा नागपूरसह विदर्भातील बड्या नेत्यांना संधी दिली.
नागपुरातून ‘या’ नेत्यांना संधी –
दक्षिण – पश्चिम नगपुमधून प्रफुल्ल गुडधे पाटील, उत्तर नागपूरमधून नितीन राऊत, पश्चिम नागपूरमधून विकास ठाकरे, मध्या नागपुरातून बंटी बाबा शेळके यांना उमेदवारी मिळाली आहे. कराड दक्षिण येथून पृथ्वीराज चव्हाण, साकोलीतून नाना पटोले, धामणगावमधून विरेंद्र जगताप,तिवसातून यशोमती ठाकूर, ब्रम्हपुरीतून विजय वडेट्टीवार रिसोडमधून अमित झनक तर देवळी (वर्धा)मधूनरणजित कांबळे, राजूरा ( चंद्रपूर)मतदार संघातून सुभाष धोटे, अमरावती शहरमधू डॉ सुनील देशमुख, अचलपूरमधून बबलू देशमुख तर कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील या बड्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नागपूर – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी काँग्रेस उमेदवार
मतदारसंघ | उमेदवार |
---|---|
उत्तर नागपूर | नितीन राऊत |
पश्चिम नागपूर | विकास ठाकरे |
मध्य नागपूर | बंटी शेलके |
दक्षिण-पश्चिम नागपूर | प्रफुल्ल गुदाधे |
दक्षिण नागपूर | अनिर्णित |
पूर्व नागपूर | राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार |
ग्रामीण नागपूर | अनिर्णित |