महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने 48 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली.
मात्र, काँग्रेसने पहिल्या यादीत केवळ तीन मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत. यावरून पक्षातील मुस्लिम नेत्यांनी संताप व्यक्त केला. अनेक नेत्यांनी उघडपणे पक्षाला विरोध सुरू केला आहे. माजी मंत्री अनीस अहमद यांनी पक्षावर हल्लाबोल करत ताशेरे ओढले. एकतर्फी पाठिंबा असूनही काँग्रेस पक्षाकडून मुस्लिमांना न्याय मिळत नाही, असे अहमद म्हणाले.
याआधी जिथे जिथे मुस्लिमांना प्रतिनिधित्व दिले जात होते, तिथे 99 टक्क्यांहून अधिक मुस्लिमांनी काँग्रेसला मतदान केले होते. मागची लोकसभा निवडणूक असो किंवा 2024, मुस्लिमांनी काँग्रेस पक्षाला एकतर्फी पाठिंबा दिला.
त्यानंतरही काँग्रेसने आम्हाला आमचे हक्क दिले नाही. आम्हाला आमचे हक्क हवे आहेत आणि आम्ही आमच्या ताकदीने मागणी करत आहोत, अन्यथा आम्ही टोकाची भूमिका घेऊ, असे अनीस अहमद म्हणाले.