नागपूर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. गिरीश पांडव यांना दक्षिण नागपुरातून उमेदवारी देण्यात आली आहे, तर सुरेश भोयर हे कामठी विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरले आहे.
भोयर हे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत. तर दक्षिण नागपुरातून पांडव यांचा सामना भाजपच्या मोहन मते यांच्याशी होणार आहे.
महाविकास आघाडीने (MVA) नागपूर शहरातील सर्व सहा जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. सावनेरमधून अनुजा केदार, भंडारा मधून पूजा ठवकर यांनाही उमेदवारी मिळाली आहे.पूर्व नागपुरातील राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) दुनेश्वर पेठे वगळता इतर सर्व उमेदवार जुनेच आहेत.भाजपने उत्तर, मध्य आणि पश्चिम नागपूरसाठी अद्याप उमेदवार निश्चित केलेले नाहीत.
महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यातील काही काँग्रेस नेत्यांची दिल्लीत शुक्रवारी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली. यानंतर आज (२६ ऑक्टोबर) काँग्रेसकडून २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या 23 उमेदवारांची नावे –
1. भुसावळ – राजेश मानवतकर
2. जळगाव – स्वाती वाकेकर
3. *अकोट – महेश गणगणे*
4. *वर्धा – शेखऱ शेंडे*
5. *सावनेर – अनुजा केदार*
6. *नागपूर दक्षिण – गिरिश पांडव*
7. *कामठी – सुरेश भोयर*
8. *भंडारा – पूजा ठवकर*
9. *अर्जुनी मोरगाव – दिलिप बनसोड*
10. *आमगाव – राजकुमार पुरम*
11. राळेगाव – वसंत पुरके
12. *यवतमाळ – अनिल मांगुलकर*
13. *आर्णी – जितेंद्र मोघे*
14. उमरखेड – साहेबराव कांबळे
15. जालना – कैलास गोरंट्याल
16. औरंगाबाद पूर्व : मधुकर देशमुख
17. वसई : विजय पाटील
18. कांदिवली पूर्व -:काळू बधेलिया
19. चारकोप – यशवंत सिंग
20. सायन कोळिवाडा : गणेश यादव
21. श्रीरामपूर : हेमंत ओगले
22. निलंगा : अभय कुमार साळुंखे
23. शिरोळ : गणपतराव पाटील