महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या रंगल्या आहेत.
काँग्रेसने नुकतीच एक पकोडा-विक्रेत्याची जाहिरात प्रदर्शित केली. या जाहिरातीच्या माध्यमातून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खिल्ली उडवली आहे.
पकोडे विकणे हा रोजगाराचा एक प्रकार असल्याचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीदरम्यान केले होते. हाच मुद्दा काँग्रेसने उचलून धरला आहे.
काँग्रेसच्या जाहिरातीत एक तरुण पकोडे विकताना दिसत आहे. अभियंता म्हणून त्याची ओळख एकाने करून दिली. त्याच्या दुकानावर मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांची वेशभूषा धारण केलेले तीन लोक येतात. तसेच ते या तरुणाचे कौतुक करताना दिसत आहे.
BIG BREAKING 🚨
Congress party has released a new ads for Maharashtra elections
It shows how BJP betrayed Maha & shifted projects worth ₹7.5 lakh crores to Gujarat 💔
Impactful & innovative, Spread it 🔥 pic.twitter.com/QfneJJmOos
— Ankit Mayank (@mr_mayank) October 28, 2024
पकोडे विकणारा अभियंता तरुण तिन्ही नेत्यांना सांगत आहे की, मी इंजिनियर आहे आणि पकोडे विकतो?यावर मुख्यमंत्री शिंदे सारखा व्यक्ती म्हणतो की, उद्या अनेक तरुण पकोडे विक्रेत्यापासून प्रेरित होतील. यावर पकोडे विक्रेता तरुण म्हणतो की, हे सर्व महायुती सरकारमुळेच शक्य झाले आहे.कारण गुजरातचे 7.5 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प आणि नोकऱ्या महाराष्ट्राने गमावल्या आहेत.
दरम्यान काँग्रेसच्या पकोडा विक्रेत्याच्या जाहिरातीचा संदर्भ जानेवारी 2018 मध्ये पंतप्रधान मोदींनी केलेल्या एका विधानावरून घेण्यात आलेला आहे. रोजगाराच्या आकडेवारीमध्ये रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते (पकोडा विक्रेते) देखील समाविष्ट केले जावे आणि त्यामुळे देशातील बेरोजगारी प्रत्यक्षात आकडेवारीच्या तुलनेत खूपच कमी असे, असे मोदी म्हणाले होते.