नागपूर: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.नागपूर मध्यमधून अनिस अहमद वंचितमधून निवडणूक लढणार होते. मात्र, वेळेवर न पोहोचल्याने अर्ज बाद झाला होता.
त्यानंतर आता पुन्हा अनिस अहमद यांनी काँग्रेसचे प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसवर नाराज असलेले अनिस अहमद आज पुन्हा कांग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत ते आज पक्ष प्रवेश करत माघारी परतणार आहे. अनिस अहमद हे कांग्रेसचे माजीमंत्री राहीलेले आहेत.
शिवाय ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे राष्ट्रीय सचिव देखील राहिले आहे. मात्र त्यांनी अलिकडे वंचितमध्ये पक्ष प्रवेश केला आणि नागपूरमधून आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला.
मात्र अवघ्या काही मिनिटांचा उशीर झाल्याने त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. परिणामी अनिस अहमद यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यावी लागली. दरम्यान ही बंडखोरी अनिस अहमद यांची खेळी असल्याचे बोलले जात आहे.