मुंबई : सुप्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले. दिल्ली येथील एम्स रुग्णालयात शारदा सिन्हा यांनी अखेरचा श्वास घेतला.
आपल्या गोड आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या शारदा या छठ पर्वात सोडून घेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शारदा सिन्हा यांच्या मुलाने आईच्या निधनाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली.
शारदा यांच्या मुलाचे नाव अंशुमन सिन्हा असं आहे.
अंशुमन सिन्हा आईचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला, ‘तुमच्या प्रार्थना आणि प्रेम सदैव आईसोबत असेल. छठी मैयाने आईला स्वतःकडे बोलावले आहे. आई आता शारीरिकदृष्ट्या आपल्यात नाही. असे अंशुमन पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
लोकगायिका शारदा सिन्हा यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. एक्सवर शारदा यांच्यासोबत फोटो पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांचं निधन झाल्यामुळे फार दुःख झालं आहे.
त्यांनी गायलेली मैथिली आणि भोजपुरी लोकगीते गेल्या अनेक दशकांपासून खूप लोकप्रिय आहेत. शारदा सिन्हा यांचं निधन म्हणजे संगीत जगताची कधीही भरून न येणारी हानी आहे. या दु:खाच्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांसह आणि चाहत्यांसह माझ्या संवेदना आहेत. ओम शांती…’ असे मोदी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत