नागपूर शहरातील गुन्हे शाखा युनिट 04 ने गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत एनडीपीएस कायदा आणि अवैध शस्त्र बाळगण्याच्या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भंडारा रोडवरील आर्या शोरूमजवळ पारडी नाका येथे 16 नोव्हेंबर 2024 रोजी मध्यरात्री 12:20 ते 2:00 वाजताच्या दरम्यान करण्यात आली.
गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, नमूद आरोपींना पारडी नाक्याजवळ थांबवून तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडून एमडी पावडर, एक देशी बनावटीची रिव्हॉल्वर, एक जिवंत काडतूस, दोन मोबाईल फोन आणि एक टाटा झेस्ट कार जप्त करण्यात आली.
जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ₹10,18,500 असून आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम 8 (अ), 22 (ब), 29 आणि भारतीय शस्त्र कायदा कलम 3+25 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त माल व आरोपींना पुढील तपासासाठी पारडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपींची ओळख:
1. मोहसिन शहा (वय 34 वर्षे)
2. ऋषी चैनसुख राठोड(वय 28 वर्षे)
जप्त मुद्देमालाचा तपशील:
1. एमडी पावडर (54.25 ग्रॅम):अंदाजे किंमत ₹5,42,500
2. देशी बनावटीची रिव्हॉल्वर:अंदाजे किंमत ₹50,000
3. जिवंत काडतूस (6mm): किंमत ₹1,000
4. दोन मोबाईल फोन: किंमत ₹25,000
5. टाटा झेस्ट कार (निळा रंग): किंमत ₹4,00,000