नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे.निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नागपूर जिल्ह्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत ६.८६ टक्के मतदान झाले आहे. तर राज्यात ६.६१ टक्के मतदान पार पडले.
विदर्भात अकोल्यात ६.०८ टक्के, अमरावतीत ६.०६, भंडारा ६.२१, बुलढाणा ६.१६, चंद्रपूर ८.०५, गडचिरोली १२.३३ आणि गोंदियात ७.९४ टक्के मतदान झाले.
एकंदरित पाहता नागपूर जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर मतदारांची चांगलीच गर्दी दिसून येत आहे. बहुतांश भागात मतदार मतदानासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.
नागपूर जिल्हा मतदान टक्केवारी (सकाळी 9 वाजता पर्यंतची) –
एकूण टक्केवारी 6.86. %
हिंगणा 5.32 %
कामठी 6.71%
काटोल 5.20 %
नागपूर मध्य 6.14 %
नागपूर नागपूर पूर्व 8.01%
नागपूर उत्तर 3.54 %
नागपूर दक्षिण 8.40 %
नागपुर दक्षिण पश्चिम 8.92%
नागपूर पश्चिम 7.50 %
रामटेक 6.71 %
सावनेर 7.25 %
उमरेड 8.98 %