नागपूर : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आज एका टप्प्यात मतदान होत आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना आपला मताधिकार बजावता येईल. दुपारी 1 वाजेपर्यंत नागपूर जिल्ह्यात 31.65 टक्के मतदान झाले असून गडचिरोलीत सर्वाधिक 50.89 टक्के मतदान झाले आहेत.
विदर्भातील इतर जिल्ह्यांबाबत बोलायचे झाले तर दुपारी 1 वाजेपर्यंत अकोल्यात 29.87 टक्के, अमरावतीत 31.32, भंडारा 35.06, बुलढाण्यात 32.91, चंद्रपूरमध्ये 35.54, गोंदियात 40.46 टक्के मतदान झाले आहे.
दुपारी 1:00 वाजेपर्यंतची जिल्ह्याची अंदाजे सरासरी टक्केवारी ३१.६५ %
हिंगणा २८.७३ %
कामठी ३३.८० %
काटोल २७.७० %
नागपूर मध्य २७.४१ %
नागपूर पूर्व ३२.३५ %
नागपूर उत्तर २९.३० %
नागपूर दक्षिण ३२.०२ %
नागपुर दक्षिण पश्चिम ३१.१२ %
नागपूर पश्चिम २९.८२ %
रामटेक ३५.५६ %
सावनेर ३४.२९ %
उमरेड ३९.३७ %