नागपूर:अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) राजीव गांधी पंचायती राज संघटनेचे (RGPRS) राष्ट्रीय सचिव म्हणून नागपूरचे अधिवक्ता अक्षय समर्थ यांची नियुक्ती केली आहे. अधिवक्ता समर्थ यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी राष्ट्रपती आणि खासदार राहुल गांधी , माजी. अध्यक्षा श सोनिया गांधी,CWC सदस्य आणि माजी खासदार मीनाक्षी नटराजन जी, RGPRS चे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, एमपीसीसी उपाध्यक्ष सचिन नाईक, सरचिटणीस (संघटना) (RGPRS), कुणाल बॅनर्जी यांचे आभार मानले. तसेच त्यांच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी सोपवल्याबद्दल ॲड.समर्थ यांनी एमपीसीसी अध्यक्ष श्री. नाना पटोले जी, श्री. विलास मुत्तेमवार जी, श्री. विकास ठाकरे जी, श्री. नितीन राऊत जी, श्री. विजय वडेटीवार जी, श्री. सुनील केदार जी आणि संपूर्ण काँग्रेस नेतृत्वाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.










