Advertisement
संगमनेर : विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.संगमनेरमधून बाळासाहेब थोरात पराभूत झाले. हा काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.
बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं की काँग्रेससह महाविकास आघाडीला १८० जागा मिळाल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका. मात्र हे म्हणणाऱ्या बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास ते मुख्यमंत्रिपदाचेही प्रमुख दावेदार मानले जात होते.