नागपूर: नागपूरच्या रहिवाशांना उच्च दर्जाचे आणि सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने, नागपूर महानगरपालिका-ऑरेंज सिटी वॉटर (NMC-OCW) ने पुढील जलकुंभांच्या (Elevated Service Reservoirs – ESRs) नियोजित साफसफाईची घोषणा केली आहे:
– लकडगंज-I ESR – सोमवार, 2 डिसेंबर 2024
– लकडगंज-II ESR – मंगळवार, 3 डिसेंबर 2024
साफसफाईच्या प्रक्रियेदरम्यान, खालील भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल:
1. लकडगंज ESR 1 CA – जुनी मंगळवारी, भुझाडे मोहल्ला, चिंचघरे मोहल्ला, स्वीपर कॉलनी, माटाघरे मोहल्ला, मट्टीपुरा, हत्तीनाला, गरोबा मैदान, दिघोरीकर चौक, कापसे चौक, धवडे मोहल्ला, माटे चौ., चाप्रू नगर, हरिहर नगर, जगजीवनराम नगर, जुना बगडगंज, बजरंग नगर, गुजर नगर, कुंभारटोली
2. लकडगंज ESR 2 CA – सतरंजीपुरा, गंगाजमुना, रामपेठ, बुद्धपुरा, कुंभारपुरा, लकडगंज लेआउट, एव्हीजी लेआउट, सतनामी नगर, शाहू मोहल्ला, भगवती नगर, छोटा कारखाना परिसर, भाऊराव नगर, धनगंज स्वीपर कॉलनी, सुदर्शन नगर, चाप्रू नगर चौक, क्वेटा कॉलनी.
टाकीच्या साफसफाईच्या कालावधीत, या बाधित भागात पाणीपुरवठा होणार नाही, तसेच पाण्याची टँकर सेवा देखील तात्पुरती अनुपलब्ध असेल. नागरिकांना विनंती आहे की या अत्यावश्यक देखभाल कार्यादरम्यान होणारी गैरसोय कमी करण्यासाठी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा.
NMC-OCW ने उपरोक्त प्रभावित भागातील नागरिकांना आवाहन केले आहे आणि या काळात नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा केली आहे.
पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.