नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाले. यानंतर सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या तीन दिवसात म्हणजेच गुरुवारी नवं सरकार स्थापन होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यापार्श्वभूमीवर महायुती सरकारने पहिले हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार असून त्याकरिता तारीखही जाहीर झाली.
हे अधिवेशन नागपूरला 16 ते 21डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. यातच प्रश्न उत्तरांचा कालावधी नसल्याने यंदा अधिवेशन कमी दिवसांचे राहणार आहे. विधानसभेच्या निकालानंतर लगेचच नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला सुरुवात झाली असून विधानभवन परिसरात रंगरंगोटी सुरु झाली.या अधिवेशनाकडे राज्यातील सर्वांच्या नजरा लागल्या असून लाडक्या बहिणीच्या वाढीवर रकमेवर अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता आहे . सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या 10 दिवसातच हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त काढण्यात आला. मात्र यंदा विरोधीपक्ष नेता नसणार आहे.यंदा आमदारांच्या बैठक व्यवस्थेमध्ये मोठे बदल करण्यात आले असून आधुनिक पद्धतीची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.