Published On : Sat, Dec 7th, 2024
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्रात विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा;मविआच्या आमदारांचा शपथ घेण्यास नाकार

Advertisement


मुंबई :महाराष्ट्रात महायुती सरकारच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. आज विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आज विधानभवनात पार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या इतर आमदारांनी विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ ग्रहण केली. मात्र महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करत आज आमदारकीची शपथ घेण्यास नकार दिला आहे.

विधानभवनात आमदारांचा शपथविधी सुरू होताच महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांचे आमदार सभात्याग करत बाहेर पडले. या आमदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

ईव्हीएममध्ये गडबड करून हे सरकार स्थापन झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात सध्या महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक सुरू असून या बैठकीत आमदारकीची शपथ घेण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर आमदार उपस्थित आहेत.

Gold Rate
16April 2025
Gold 24 KT 95,000/-
Gold 22 KT 88,400/-
Silver / Kg - 96,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement