नागपूर : देशातील पहिली हायस्पीड ट्रेन मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. ताशी 320 ते 350 किमी वेगाने धावणारी बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे 508 किमीचे अंतर अवघ्या 2 ते 2.30 तासांत पूर्ण करेल. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान 12 बुलेट ट्रेन स्थानकांची रूपरेषा तयार करण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. या मार्गानंतर नागपूर-मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचेही काम केले जाईल, ज्याचा अन्य 7 मार्गांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे मुंबई-अहमदाबादनंतर आणखी अनेक मार्गांवर बुलेट ट्रेन चालवण्याची योजना आखण्यात आली आहे. असेही समोर आले आहे की रेल्वे मंत्री वैष्णव यांनी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ला आणखी 7 हायस्पीड मार्गांबद्दल विचारले. ते म्हणाले की यापैकी दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-हावडा बुलेट ट्रेन उत्तर प्रदेशातून जातील परंतु हे कॉरिडॉर हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर म्हणून तात्पुरते असतील.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, कॉरिडॉर खूप महागडे ठरू शकतात. कोणत्याही हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरला मंजुरी देताना डीपीआरचा परिणाम, तांत्रिक व्यवहार्यता, खर्च, आर्थिक बांधिलकी आणि संसाधनांची उपलब्धता यासारख्या अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या जातात, असेही सांगण्यात आले.
आगामी काळात ‘या’ मार्गांवर धावणार बुलेट ट्रेन-
मुंबई-नागपूर
दिल्ली-वाराणसी
दिल्ली-अहमदाबाद
दिल्ली-अमृतसर
मुंबई-पुणे-हैदराबाद
चेन्नई-बेंगळुरू-म्हैसूर
वाराणसी-हावडा